Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, June 15, 2021

सामान्य विज्ञान

सामान्य विज्ञान

शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य

 उपकरणाचे नाव -  कार्य 

·         व्होल्टमापी - विजेचा दाब 

·         प्रकाशमापी - प्रकाशाची तीव्रता 

·         पर्जन्यमापी - पर्जन्यमान 

·         ज्वरमापी - शरीराचे तापमान 

·         आर्द्रतामापक - आर्द्रता 

·         तापमान लेखक - तापमानातील बदलाची नोंद 

·         स्टेथेस्कोप - हृदयाचे ठोके मोजणे 

·         होकायंत्र - उत्तर व इतर दिशा दाखविणे

·          

·         उंचीमापी - उंचातील विषमता व संबंध 

·         तरकांटा - द्रव पदार्थाची सापेक्ष घनता 

·         सुक्ष्ममापी - सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे 

·         वातकूक्कुट - वार्‍याची दिशा 

·         विद्युत जनित्र - विद्युत प्रवाहाची शक्ती 

·         वकृतामापी - गोलाकार वस्तूची वक्रता 

·         सेक्सटंट - दोन वस्तुतील कोणात्मक अंतर 

·         वर्णमापी - रंगाच्या तीव्रतेतील फरक 

·         परिगणक - गणिती आकडेवारी 

·         श्रवणमापक - श्रवणशक्तीतील फरक 

·         दूरमुद्रक - संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे 

·         गणकयंत्र - प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे 

·         कॅलरीमापी - उष्णतेचे प्रमाण 

·         विस्थरीमापी - द्रव्यपदार्थाचा चिकटपणा 

·         किरण लेखन यंत्र - सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे 

·         सुक्ष्मदर्शक - सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे 

·         समतलमापी - क्षितीज समांतर पातळी मोजणे 

·         विद्युत भारमापी - विद्युतभाराचे अस्तित्व 

·         वायुवेग मापक - वार्‍याची दिशा आणि भार 

·         दुग्धता मापी - दुधांची सापेक्ष घनता

शास्त्रीय नियमांचे संशोधक

शास्त्रज्ञाचे नाव

एकक

देश

जेम्स वॅट

वॅट

स्कॉटलँड

जॉर्ज सायमन ओहम

ओहम

जर्मनी

माईकेल फॅरेडे

फॅरेडे

ब्रिटिश

सी.व्ही. रमन

रामन इफेक्ट

भारतीय

विल्टेन इडूअर्ड वेबर

वेबर

जर्मनी

ब्लॅक पास्कल

पास्कल

फ्रान्स

लॉर्ड केल्विन

केल्विन

ब्रिटिश

हेंरीच रुडॉल्फ हार्टज

हार्टज

जर्मनी

एंड्रीमेरी अॅम्पीअर

अॅम्पीअर

फ्रान्स

सर आयझेक न्यूटन

न्यूटन

ब्रिटिश

एलेस्स्लैड्रो होल्ट

होल्ट

इटालियन

जेम्स प्रेसकॉट ज्युल

ज्युल

ब्रिटिश

 

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

·         भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी. 

·         विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र -  पितळ

·         धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

·         उपयोग - भांडी तयार करण्याकरिता 

संमिश्र - ब्राँझ

·         धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)  

·         उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता 

संमिश्र - जर्मन सिल्व्हर  

·         धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%) 

·         उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो. 

संमिश्र - बेल मेटल  

·         धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%) 

·         उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता 

संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ

·         उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता 

संमिश्र - गनमेटल  

·         धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%) 

·         उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता

2. लोखंडाचे प्रकार व उपयोग :

·         लोखंडाचे तीन प्रकार पडतात. 

·         ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. 

·         नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो. 

·         पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो. 

लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र - स्टेनलेस स्टील

·         धातू - लोखंड, क्रोमीअम, कार्बन

·         उपयोग - तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता 

संमिश्र - टंगस्टन स्टील  

·         धातू - लोखंड, टंगस्टन व कार्बन

·         उपयोग - जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र - मॅगनीज स्टील

·         धातू - लोखंड व मॅगनीज 

·         उपयोग - कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता. 

संमिश्र - क्रोमीअम स्टील

·         धातू - लोखंड व क्रोमीअम

·         उपयोग - बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.

3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

·         घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता 

·         चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता 

·         विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता. 

·         रुपेरी रंग तयार करण्याकरिता. 

अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र - ड्युरालयुनिम

·         धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज 

·         उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता. 

संमिश्र - मॅग्नेलियम

·         धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम

·         उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता. 

संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ

·         धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.

संमिश्र - अल्किनो

·         धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल 

·         उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.

4. जस्ताचे उपयोग :

·         लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता. 

·         विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो. 

·         धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5. पाराचा उपयोग :

·         हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात. 

·         बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात. 

·         आरसे तयार करण्याकरिता केला जातो.

6. सोडीयमचे उपयोग :

·         सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.

·         उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.

7. मॅग्नेशियमचे उपयोग :

·         क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात. 

·         शोभेच्या दारूमध्ये.

·         धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता. 

·         धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.

8. चांदीचा उपयोग :

·         दागिने तयार करण्याकरिता 

·         चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो. 

·         छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता. 

·         विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.

9. सोन्याचे उपयोग :

·         नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.

10. शिशाचा उपयोग :

·         मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.  

·         दारूगोळा तयार करण्याकरिता.  

·         विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता. 

·         विद्युत परीपथकात वितळतार करण्यास. 

·         अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.    

·         डाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे. 

·         पुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.

11. कथिलचा उपयोग :

·         मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता 

·         रंग तयार करण्याकरिता 

·         विद्युत परीपथकामध्ये 

·         मिश्रधातू तयार करण्याकरिता

·          

·         विद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.

12. गांधकाचे उपयोग :

·         सल्फ्युरिक अॅसिडच्या उत्पादनकरिता. 

·         आगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता. 

·         गंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो. 

·         सल्फा ड्रग तयार करण्याकरिता 

·         बंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता 

·         रबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.

13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :

·         सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीकरिता. 

·         साखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता. 

·         कागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता 

·         द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.

14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :

·         तांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात. 

·         अतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता 

·         उंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता. 

·         स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता 

·         स्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता

15. क्लोरीनचे उपयोग :

·         कापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता. 

·         क्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो. 

·         क्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता. 

·         कृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता. 

·         विरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.

16. ब्रोमीनचे उपयोग :

·         ब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात. 

·         रंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात. 

·         फोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात. 

·         औषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.

17. आयोडिनचे उपयोग :

·         टिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता. 

·         आयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात. 

·         कृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.

18. हिर्‍याचा उपयोग :

·         दागिण्यातील रत्न म्हणून 

·         कठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.

19. ग्रॅफाईट उपयोग :

·         विद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून 

·         शिसपेन्सिल तयार करण्याकरिता 

·         उच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून 

·         युरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून

20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :

 

·         कार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात. 

·         कार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात

·         रंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता 

·         फॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.

21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :

·         सोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता 

·         वायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता 

·         अग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता 

·         अन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.

22. मिथेनचा उपयोग :

·         गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून 

·         काजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता. 

·         ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून 

·         हायड्रोजनचे उत्पादन घेण्याकरिता

23. मिथेनॉलचा उपयोग

·         प्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून. 

·         लाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून 

·         सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.

24. इथिलिनचा उपयोग :

·         कातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता. 

·         कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याकरिता. 

·         प्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.

25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :

·         सेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता. 

·         कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता 

·         लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.

26. बेंझीनचा उपयोग :

·         चरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता. 

·         ड्रायक्लीनिंगसाठी 

·         पेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून 

·         निरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.        

भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

शास्त्रज्ञाचे नाव

शोध/पुरस्कार/कार्य

सत्येन्द्रनाथ बोस -

इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांच्या समुहांचे संख्या शास्त्रीय नियम शोधले(1924). बोस आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्सच्या नियमांना पाळणार्‍या अनुमधील मुलकणांना सत्येन्द्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ बोसॉन असे नाव देण्यात आले. 
जुलै 2012 मध्ये 'सर्न' या संस्थेने मिनी बिग बँग प्रयोगातून शोधलेला मूलभूत कण 'गॉड पार्टिकल' ला हिग्ज-बोसॉन कण असे नाव देण्यात आले.

बिरबल सहानी 

जिन्मोस्पर्म या वृक्ष आणि रोपांचा शोध लावला. द पॉलिओबोटॅनिक सोसायटीची स्थापना (1946)

डॉ. एस. चंद्रशेखर

तार्‍यांची रचना, सापेक्षता व कृष्ण विवर इ. विषयांवर सैद्धांतिक ग्रंथ निर्मिती, 1983 चा नोबेल

हरगोविंद खुराणा

कृत्रिमरित्या जनुक (DNA) तयार केले. 1968 चा नोबेल

विक्रम साराभाई

शृंखला पद्धतीने अनुविच्छेदन करण्याचे तंत्र भारतात निर्माण केले. थुंबा (केरळ) येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची स्थापना (1963)

श्रीनिवास रामानुज

आधुनिक काळातील एक असामान्य गणिती व्यक्तिमत्व

जगदिशचंद्र बोस

वान्स्पतींना संवेदना असतात, असे प्रतिपादन केले. क्रेस्क्रोग्राफचा शोध बोस रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाताची स्थापना

डॉ. होमी जहांगीर भाभा

यांच्या अध्यक्षतेखाली भाभा, अणुसंशोधन केंद्राची स्थापना (BARC)-1957

चंद्रशेखर व्यंकट रमन

रामन इफेक्ट, विज्ञानातील नोबेल मिळविणारे पहिले भारतीय (1930)

सर व्यंकटरमन रामकृष्णन

2009 चे रसायन शास्त्राचे नोबेल, 2010 चे पद्मविभूषण, 2012 चा नाईटहुड पुरस्कार

जयंत नारळीकर 

स्टडी स्टेट थिअरी या सिद्धांतास फ्रेड हॉइल यांना मदतीला घेऊन नारळीकरांनी नवे रूप देण्याचा प्रयत्न केला.

मेघनाथ साहा

किरर्णोत्सर्ग दबावाचा सिद्धांत, थर्मल आयोनायझेशान सिद्धांत, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची भारता

 

काही महत्वाची एकके

एककाचे नाव

वापर

मापन

नॉट 

सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

1 नॉटिकल मैल=6076 फुट

फॅदम

समुद्राची खोली मोजण्याचे एकक

1 फॅदम=6 फुट

प्रकाशवर्ष

तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर

अँगस्ट्रॉंम

प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

बार  

वायुदाब मोजण्याचे एकक

1 बार=10 डाईन्स दाब/चौ

पौंड

वजन मोजण्याचे एकक

2000 पौंड=1 टन

कॅलरी

उष्णता मोजण्याचे एकक

1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

अॅम्पीअर

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

मायक्रोन

लांबीचे वैज्ञानिक एकक

1 मायक्रोन=0.001 मिमी

हँड

घोड्याची उंची मोजण्याचे एकक

1 हँड=4 इंच

गाठ

कापूस गाठी मोजण्याचे एकक

1 गाठ=500 पौंड

रोएंटजेन

क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

वॅट

शक्तीचे एकक

1 हॉर्सपॉवर=746 वॅट

हॉर्सपॉवर

स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.

दस्ता

कागदसंख्या मोजण्याचे एकक

1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते

एकर

जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

1 एकर = 43560 चौ.फुट

मैल

अंतर मोजण्याचे एकक

1 मैल=1609.35 मीटर

हर्टझ -  -

विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

1 हर्टझ=प्रतिसेकंद होणार्‍या आवृत्तींची संख्या

 

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

·         सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 

·         सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे. 

·         आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते. 

1. सत्व - अ  

·         शास्त्रीय नांव - रेटीनॉल  

·         उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता 

·         अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा 

·         स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व - ब1

·         शास्त्रीय नांव - थायमिन  

·         उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - बेरीबेरी 

·         स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत

3. सत्व - ब2

·         शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन  

·         उपयोग - चयापचय क्रियेकरिता 

·         अभावी होणारे आजार - पेलाग्रा 

·         स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे 

4. सत्व - ब3

·         शास्त्रीय नांव - नायसीन 

·         उपयोग - त्वचा व केस 

·         अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे 

·         स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी 

5. सत्व - ब6  

·         शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन  

·         उपयोग - रक्त संवर्धनाकरिता 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया

·          

·         स्त्रोत - यकृत व पालेभाज्या 

6. सत्व - ब10  

·         शास्त्रीय नांव - फॉलीक  

·         उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया 

·         स्त्रोत - यकृत 

7. सत्व - क  

·         शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड  

·         उपयोग -  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

·         अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

·         स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि 

8. सत्व - ड  

·         शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल  

·         उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

·          

·         स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे 

9. सत्व - इ  

·         शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल 

·         उपयोग - योग्य प्रजननासाठी  

·         अभावी होणारे आजार - वांझपणा 

·         स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या 

10. सत्व - के  

·         शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान  

·         उपयोग - रक्त गोठण्यास मदत 

·         अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही 

·         स्त्रोत - पालेभाज्या व कोबी

सामान्य विज्ञान (इयत्ता 8 वी) संपूर्ण माहिती

आकाशगंगा :

 

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

 

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

 

प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

 

चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

 

एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

 

एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 

प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 

बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

 

बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

 

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

 

पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

 

'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

 

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

 

गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

 

शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 

शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 

धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

 

हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

 

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

 

त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

 

इस्त्रोया संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.

 

GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

 

टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 

आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

 

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 

 चुंबकत्व :

 

5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 

चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 

मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 

 अणूंची संरचना :

 

इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत.

 

अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

 

प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

 

अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

 

अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

 

मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

 

मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.

 

 महत्वाचे मुद्दे :

 

विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

 

जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

 

स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.

 

पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 

साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

 

संसर्गजन्य रोग क्षय, इन्फ्लुएंझा, इ.

 

संपर्कजन्य रोग खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 

पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 

रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 

WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)

 

मनुष्यप्राणी 'व्हीब्रिओ कॉलरा' या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.

 

लसीकरण बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

 

त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

सामान्य विज्ञान (इयत्ता 7 वी) संपूर्ण माहिती

महत्वाचे मुद्दे :

·         अनविकरणीय हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).

·         हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

·         इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

·         समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

·         तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच 'नालाबंर्डिंग' असे म्हणतात.

·         20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

·         वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

·         डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.

·         संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

·         पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

·         22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

·         जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

·         वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

·         अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

·         वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते. 

·         भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला 'पायरोमीटर' म्हणतात.

·         आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

·         अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

·         सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

·         समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला 'उती' असे म्हणतात.

·         उती पातळीवर संघटन असणारे सजीव मॉस, शैवाल, जलव्याल.

·         ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला 'इंद्रिय संस्था' म्हणतात.

·         प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस 'अधिवास' म्हणतात.

·         एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.

·         कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)

·         पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.

·         पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला 'परागण' असे म्हणतात.

·         अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.

·         सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.

·         हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना 'धमण्या' म्हणतात.

·         शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना 'शिरा' म्हणतात.

·         धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात.

·         अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.

·         अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.

·         अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.

·         मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात.

·         पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

·         रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.

·         20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात.

·         अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.

·         20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.

·         अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात.

·         काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.

·         एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.

·         आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.

·         छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.

·         स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.

·         शर्करांचे प्रकार  फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.

·         प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.

·         प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

·         आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

·         '' जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

·         '' जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी 

·         '' जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कव्ह्री 

·         '' जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.

·         कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

·         फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

·         लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

·         आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

·         आपल्या मानेत असणार्यां अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

·         प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्याप रासायनिक पदार्थांना 'संप्रेरके' म्हणतात.

·         जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

·         किटकभक्षी वनस्पती दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

·         जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

·         लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.

·         रंगाचा क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

·         उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते वहन, अभिसरण, प्रारण.

·         थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

·         गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना 'थर्मोवेयर' म्हणतात.

·         उष्णतेचे सुवाहक तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.

उष्णतेचे दुर्वाहक माती, लाकूड, काच, इ.

·         रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया 'रक्त पराधन' होय.

·         रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.

·         प्रजनन मुख्यत्वे पुढील दोन प्रकारे होते

 अलैंगिक प्रजनन :

वनस्पती -

1.    शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2.    विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल 

3.    कलिकायन -    किन्व यीस्ट 

4.    बिजाणूजन्य - बुरेशी 

5.    खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा 

 लैंगिक प्रजनन:

वनस्पती -

·         सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

प्राणी -

·         नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

·         वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

·         बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

·         आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

·         कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

·         परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

·         जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

·         विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

·         हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

·         आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ :

·         पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.  
  

·         तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.  
          

·         पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.   
     

·         जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.  
                        

·         पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते. 

प्रथिने

·         तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात. 
                            

·         विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

स्निग्ध पदार्थ -    

·         तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.   
            

·         स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

·         पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 चेतासंस्था :

·         मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.

·         चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात. 

·         मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.

·         चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.

·         चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.

·         शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.

·         चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

·         काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.

·         अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ. 

 आम्ल आणि आम्लारी :

·         सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.

·         पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना 'अल्कली' म्हणतात.

·         सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.

·         उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.

·         जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट.
           

·         दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. 

·         अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.

·         दाहक आम्लारी आणि सौम्य आम्ल यातून मिळणारे क्षार हे आम्लारिधर्मी असतात. 

·         धुण्याचा सोडा (सोडीयम कार्बोनेट), बेकिंग सोडा (सोडीयम बायकार्बोनेट) हे क्षार आम्लारिधर्मी आहेत.

·         प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.

·         लोणची, मुरांबा टिकविण्यासाठी अॅसेटीक आम्ल किंवा बेंझोईक आम्ल वापरतात.

·         आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते.

·         गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. त्यावर उपाय म्हणून मॅग्नेशियम हायड्रोक्साइड सारखी आम्लारिधर्मी औषधे दिली जातात.

·         कला रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौरचुलीतील भाड्यांना बाहेरून काळा रंग असतो.

·         तापमापीमध्ये पार्‍याऐवजी अल्कोहोल वापरता येईल.

·         पाण्याची विशिष्ट उष्मा सर्वाधिक असल्यामुळे शीतक म्हणून मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये त्याचा उपयोग होतो.

·         लघवीमधील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते.

·         आरसा पुसल्याने त्यावर विधूतभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते.

·         शीतपेयातील सोडा आम्लारी वर्गात मोडतो.

डायनामोमीटर

इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे

हॉट एअर ओव्हम

अधिक तापमान वाढविणारे उपकरण

कॉम्युटर

क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र

रेफ्रीजरेटर

तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण

स्पिडोमीटर

गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण

हायड्रोफोन

पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण

टेलेस्टार

तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.

टाईपराईटर

टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण

टेलीग्राफ

सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.

अल्टीमीटर

समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

ऑक्टोक्लेव्ह

दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.

सिस्मोग्राफ

भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र

अॅमीटर

अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.

अॅनिमोमीटर

वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी

गायग्रोस्कोप

वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.

पायरोमीटर

उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण

बॅरोमीटर

हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

टेलिप्रिंटर

तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.

मायक्रोस्कोप

सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

क्रोनीमीटर

जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.

लॅक्टोमीटर

दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.

कार्डिओग्राफ

हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.

सायक्लोस्टायलिंग

छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.

कार्बोरेटर

पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.

मॅनोमीटर

वायुचा दाब मोजणारे उपकरण

ऑडिओमीटर

ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

मायक्रोफोन

ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.

रडार

रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.

हायड्रोमीटर

द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

मायक्रोमीटर

अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर - 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण

थर्मोस्टेट

ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.

थिअडोलाईट

उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

·          

****************************************************************************

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages